सा य ना ई ड - (भाग २)

  • 14.4k
  • 1
  • 8.4k

सायनाईडप्रकरण दोन दुपार च्या कामासाठी पाणिनी पटवर्धन ऑफिस मधून बाहेर पडायच्याच तयारीत होता. त्याच वेळी त्याची सेक्रेटरी सौम्या सोहनी म्हणाली, “ बाहेर च्या ऑफिस मध्ये डॉ. कार्तिक बसले आहेत, ते आपल्या ऑफिस मधे सारखे अस्वस्थ पणे येरझऱ्या घालत होते. मी त्यांना सांगितलं की ५ वाजायला आलेत आणि....”“काय हवंय त्यांना ? “ पाणिनी पटवर्धन ने मधेच विचारलं. “ ते म्हणताहेत की काही झालं तरी तुम्हाला भेटायच आहेच त्यांना , त्यांच्याकडे एक मोठ उपकरण आहे, ते टेप रेकॉर्डर सारखे दिसतंय “‘ मी भेटतो त्यांना , “ पाणिनी पटवर्धन म्हणाला. “काहीतरी अती महत्वाचे असल्या शिवाय डॉ. कार्तिक असे तडकाफडकी येणार नाहीत ““तडकाफडकी?” सौम्या सोहनी ने