सा य ना ई ड - (भाग १)

  • 20.2k
  • 1
  • 11.6k

माझी रहस्य कथा सायनाइडक्रमशः प्रसिध्द करत आहे.यातील सर्व प्रसंग घटना भूमिका पात्रे काल्पनिक असून त्याचा अन्य कोणत्याही भाषेतील कोणत्याही कथेशी तसेच वास्तवातील भूमिका पात्रे प्रसंग याच्याशी संबंध नाही.सायनाईड सायनाईड प्रकरण १गुंगीत असलेली ती मुलगी कोचावर पहुडली होती,तिचा डावा हात लांब पसरला होता. तिच्या बाजूला जो माणूस उभा होता,त्याने आपल्या हातात टेप रेकॉर्डर चा मायक्रोफोन धरला होता."तुझं नाव काय आहे?" त्याने विचारले.माणसाच्या आवाजाच्या कंपनाने टेप रेकॉर्डर वरचा एक दिवा लुकलुकला.त्याने डाव्या हाताने टेप रेकॉर्डर च्या आवाजाच्या पातळीत थोडा बदल केला.त्याचा आवाज शांत,ठाम, सकारात्मक वाटावा असा होता. गरजेपुरता भारदस्त, अधिकार युक्त होता. मुलीच्या अंतर्मनात उत्तर देण्यासाठी विरोध निर्माण होणार नाही इतपत हुकुमी आवाजात त्याने