कोल्हापूर महाराष्ट्र राज्यातील दक्षिणेकडील शेवटचा जिल्हा.कोल्हापूर बद्दल जितकं सांगितलं जाव तितकं कमीच असेल.सह्याद्रीच्या पर्वत रांगानी सुजलाम सुफलाम झालेल्या व ऐतिहासिक गड कोटानी वेढलेला कोल्हापूर जिल्हा पर्यटना साठी उत्तम आहे.दुर्ग ,थंड हवेची ठिकाणे , अभयारण्य,हेरिटेज वास्तू ,धरणे,जंगल सफरीचा ठिकाणे असे वैविध्य कोल्हापूर जिल्ह्याच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळते.कोल्हापूर मधील वर्षभरातील तापमान १२ अंश सेल्सिअस ते ३५ अंश सेल्सिअस या दरम्यान असते.कोल्हापुरातील उन्हाळा शेजारच्या म्हणजेच सातारा,सांगली ,सोलापूर जिल्ह्याच्या व इतर शहराच्या तुलनेने थंड पणं जास्त दमट असतो.कोल्हापूर पश्चिम घाटा जवळ असल्याने जून ते सप्टेंबर दरम्यान भरपूर पाऊस पडतो त्यामुळे बरेचदा पुरा ची स्थिती उद्भवते.कोल्हापूर जिल्हा प्रसिद्ध आहे पणं त्या साठी कोणती एक गोष्ट