दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण -१६)

  • 8.6k
  • 1
  • 4.9k

दॅट्स ऑल युअर ऑनर -१६“ पण पटवर्धन हे आरोपीचे वकील आहेत.तिच्याच वतीने ते काम बघत आहेत.म्हणजे त्यांची उपस्थिती ही आरोपीची उपस्थिती असल्या सारखीच आहे.” दैविक दयाळ म्हणाला. “ मी माझा आदेश दिलाय. ” न्या.भाटवडेकर म्हणाले. अॅड.खांडेकर उठून उभे राहिले. ते एकदम जाड जुड आणि भरदार शरीर यष्टीचे होते. दमदार आवाजात ते म्हणाले, “ कोर्ट माझं म्हणणे ऐकून घेईल का? ” “ बोला.” न्या.भाटवडेकर म्हणाले. “ हे गंभीर प्रकरण आहे आणि अचानक उद्भवले आहे त्यामुळे आम्हाला या बाबतीत न्यायालयाने दिलेले निवाडे वानगी दाखल देण्यासाठी वेळ मिळाला नाही परंतु माझी खात्री आहे की पटवर्धन आणि आरोपीचे परस्पर संबंध हे एजन्सी म्हणजे प्रतिनिधी या व्याख्येत बसणारे आहेत