कालाय तस्मै नमः - 5

  • 6.5k
  • 3.1k

कालाय तस्मै नमः| भाग ५ पारायण पहाटेच साधना आवरून श्रीपाद खोलीबाहेर आला. माई आणि संगीताची तयारी करून झाली होती. अरुंधतीला थोडंसं बरं वाटत असल्याने ती आज लवकर उठून आवरून बसली होती. घरात वेगवेगळ्या पूजा , पारायणे सतत होत असत त्यामुळे त्यासाठी एक विशिष्ट जागा तयार केली होती, जिथून संपूर्ण घराकडे नजर टाकणे शक्य होत असे. आणि वाचनाचा आवाजही घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जात असे. ह्या जागेच्या अगदी समोर एक खोली होती, जिथे अरुंधतीच्या बसण्याची व्यवस्था केली होती. तिला खूप वेळ बसून राहून ऐकणे शक्य नसल्याने झोपून ऐकता येईल अशी सोय होती. तसेच मधल्या जागेत इतरांसाठी बसण्याची सोय होती. देवाला नमस्कार करून श्रीपादने संकल्प सोडत वाचनास सुरुवात केली.