कालाय तस्मै नमः - 2

  • 7.2k
  • 3.5k

कालाय तस्मै नमः| भाग २सुखाच्या हिंदोळ्यावरमाई आणि काका त्या दोघांना डोळे भरून बघत होते. तेव्हढ्यात संगीताने आत जाऊन ओवळण्यासाठी भाकरी तुकडा आणि पाणी आणलं. माईंनी तिलाच ते करायला लावलं. आनंदाने तुकडा ओवाळून दोघांच्या पायावर पाणी घालत ती बाहेरच्या दिशेने गेली. ती परत आली तरीही ते तसेच उभे होते कारण माईंना आनंदाच्या भरात काही सुचतच नव्हते. भास्कर ज्याच्या लेकीचं बारसं आहे तो मागून येत म्हणाला, “दादा ये ना रे आत. तुझीच उणीव भासत होती. आता कसं घर भरल्यासारखं वाटतंय.” हसून त्याच्याकडे बघत त्याने मुलाचा हात धरूनच आत उजवा पाय टाकला. तसेच समोरच उभ्या असलेल्या माई आणि काकांना वाकून नमस्कार केला. त्या छोट्यानेही