एकनाथ महाराज 2 नाथांचे घरी हरी पाणी भरी “आवडिने कावडिने,प्रभुने सदनात वाहिले पाणी। एकची काय वदावे पडल्या कार्यार्थ वाहिले पाणी ।जपि तपि सन्याशाहून, श्रीहरिला भक्त फर आवडतो ।स्पष्ट पहा नाथगृही घेऊनि वाहे जलची कावड तो ।।--मोरोपंत द्वारकेत मादनराय शर्मा नावाचा एक महाराष्ट्रातील ब्राह्मण श्रीकृष्ण दर्शना करीत तप करीत बसला होता,त्याला बारा वर्षां नंतर रुक्मिणी मातेने स्वप्नात येऊन,सांगितले की,भगवान येथे नाहीत,दक्षिणेत गोदावरी तीरावरील पैठण येथे भक्त एकानाथाच्या घरी श्रीखंड्याच्या रूपाने सेवा करीत आहेत,तिकडे जा म्हणजे दर्शन होईल.त्या प्रमाणे तो द्वारकेहुन निघून मजल दर मजल करीत तो पैठण येथे आला व नाथांच्या घराचा शोध करीत नाथांना येऊन भेटला.नाथांनी त्याचे स्वागत केले.तो आला