दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण -१५)

  • 7.9k
  • 4.4k

दॅट्स ऑल युअर ऑनर प्रकरण १५इन्स्पे.तारकर आत्मविश्वासाने पिंजऱ्यात आला. त्याचा देह बोलीवरून त्याने साक्ष देण्यासाठी आणि पटवर्धन च्या उलट तपासणी साठी चांगलीच तयारी केली असावी असे जाणवत होते. “ तू आधीच शप्पथ घेतली आहेस तेव्हा पुन्हा घेण्याची गरज नाही.” दैविक दयाळ म्हणाला, “ काल संध्याकाळी तुला देवनार येथील मैथिली आहुजा राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये जाण्याचा योग आला.? ” “ हो सर्.” “ त्यापूर्वी पुरावा म्हणून कोर्टात सादर झालेला ड्रेस, जो एका विशिष्ठ ठिकाणी फाटला होता, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केलास का? ” “ “ काय केलेस तू?” “ मी दोन गोष्टी केल्या, एक म्हणजे, तो पोषाख ज्या दुकानातून खरेदी केला होता त्याचा शोध घेतला. तो देवनार मधूनच