दॅट्स ऑल युअर ऑनर प्रकरण चौदासकाळी दहाला अर्धा मिनिट बाकी असतानाच अॅड.खांडेकर लांब टांगा टाकत कोर्टात आले आणि पटवर्धन कडे शिष्ठाचार म्हणून ओळखीचा कटाक्ष टाकून आपल्या सहकाऱ्याशेजारी म्हणजे दैविक दयाळ शेजारी बसले. न्या.भाटवडेकर स्थानापन्न झाले.अॅड.खांडेकर ना कोर्टात बघून त्यांना आश्चर्यच वाटले. “ तुमचे काही काम होते का अॅड.खांडेकर ? ” त्यांनी विचारले. “ नाही नाही.मी फक्त खटला ऐकायला आलोय. ” ते म्हणाले. पण न्यायाधीशांचे या उत्तराने समाधान झाले नाही. “ मला नवल वाटतय, हा अत्यंत साधा खटला आहे, प्राथमिक सुनावणी आहे. आणि जवळ जवळ संपताच आला आहे.अगदी एखादी दुसरी साक्ष बाकी आहे.” “ ते काहीही असले तरी मी बसतो आहे कोर्टात.मी कोर्टाला सांगू