‘कायदा वगैरे सोडून अगदी दोन वर्ष उलटली होती. स्वतःला न्याय मिळवून न देऊ शकलेली भूमी... कायदा आणि न्याय या गोष्टी जवळजवळ विसरून बसली होती. क्षिजीतला मदत करायची म्हणून का असेना तिला पुन्हा एकदा आर्टिकल्स आणि सेक्शन पाहावे लागणार होते. विभासकडून फसवणूक झाल्यावर भूमीने काम वैगरे सगळं सोडलं होत. माई-नाना यांची देखभाल करणे यापलिकडे तिला काही करावंस वाटेना, त्यांना विभास बद्दल सार काही खरं सांगावं असं तिला नेहमी वाटे,पण त्यांना सोडून या जगात तिचं असं दुसरं कोणीही नाही. त्यांनी एवढं प्रेम तिला दिला होत. कि त्यांना गमावण्याच्या भीतीपोटी आहे ती परिस्थिती सांभाळून आला दिवस जगायचं, एवढंच तिने ठरवलं होत.’ 'चला चार