नक्षत्रांचे देणे - ६

  • 8.5k
  • 1
  • 4.9k

'विभासबरोबर बोलणं झालं, भूमी पोहोचल्याच समजल्यावर माई निर्धास्त झाल्या. त्यांचा सगळा जीव आपल्या मुलापेक्षा भूमीमध्ये गुंतलेला असायचा. ती नाही म्हंटल्यावर सगळं घर खायला उठलं होतं. नानांचं तर जेवणातही मन लागेना. ते तासंतास पेपर्सचे गठ्ठे चाळत बसायचे. भूमी आणि विभासच्या आयुष्यात नक्की काय चाललत, याची त्यांना थोडी भनक लागलेली होती. भूमी सांगत नसली तरीही काहीतरी गडबड आहे हे त्यांना समजलं होत. विभासपेक्षा काजळी होती ती भूमीची. 'आईबाप विना वाढलेली मुलगी, स्वतःच्या हिमतीवर शिकून डिग्री घेतली. लग्न देखील स्वकमाईतून केलं. आता कुठे तिच्या आयुष्यात चांगले दिवस यायला लागलेत. पण विभास? तो अस का वागतोय? का तिच्याकडे लक्ष देत नाही.? ' याचा विचार