दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण -१३)

  • 8.9k
  • 4.9k

दॅट्स ऑल युअर ऑनर प्रकरण तेरा. पाणिनी पटवर्धन सौम्या सोहोनी ला घेऊन मैथिली आहुजा राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये गेला.दारावरील बेल वारंवार वाजवून सुद्धा दार उघडले गेले नाही. तेव्हा तो अपार्टमेंट च्या स्वगातिके कडे गेला. ती चांगली तरतरीत मुलगी होती.“ मला तातडीने मैथिली आहुजाला भेटायचं होत . पण ती दिसत नाहीये ”. पाणिनी म्हणाला.“ ती नाहीये .” ती मुलगी म्हणाली. “ तिला मी दुपारीच दोन मोठ्या सुटकेसेस घेऊन बाहेर पडताना पाहिलंय. बहुदा ती बरेच दिवसांसाठी जात असावी. तुम्ही तिच्या नोकरीच्या ठिकाणी चौकशी केली का? ’“ ती कुठे नोकरी करते ,माहित्ये का तुम्हाला?” पाणिनी ने विचारले.“ कुठल्या तरी खाजगी कंपनीत ती सेक्रेटरी आहे म्हणे.पण नाव