जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे! निराधार आभाळाचा तोच भार साहे ! “ मी असं म्हणेन की, " निराधार बालकांचा तोच भार साहे." विशाल दादा ! माझी आणि विशाल दादाची भेट खूप योगायोगाने झाली. दादाला भेटणं हे नशिबातच होत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. साधारण एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे.. सप्टेंबर २०२० . माझा वाढदिवस अश्या ठिकाणी साजरा करूया ज्यामुळे ऐन कोरोना काळात गरजू लोकांना मदत होईल, अशी इच्छा अनिलने व्यक्त केली. आमच्या ओळखीचे स्पर्श फाउंडेशन चे संस्थापक श्री सूरज सावंत यांच्याकडे आम्ही हे मनोगत मांडले. त्यांनी आम्हाला दोन तीन अनाथ आश्रम आणि साई आधार बद्दल