पासपोर्ट, कपडे, खाण्याच्या वस्तू वैगरे वैगरे सगळं भरून झालं. भूमी परत परत चेक करून बघत होती. "भूमी हा फराळ आणि गोडाधोडाचे डब्बे घेऊन जायला परवानगी आहे ना? नाहीतर सगळं काढून घेतील चेकिंगच्या वेळेस..." माईंनी तिच्यासाठी बनवलेला फराळ, काही स्वीट्स सुद्धा बॅगमध्ये व्यवस्थित ठेवून दिले होते. "सगळं चालत हो माई. " आवराआवर करत भूमी एकेक सामान चेक करत होती. "माझ्या लेकाला पण दे हो थोडं. स्वतःच नको खाऊ..." माई हसत-हसत म्हणाल्या. "हो माई." एवढंच बोलून भूमी अंगणात आली. तुळशी वृंदावनासमोर हात जोडून ती आता घराचा निरोप घेणार होती. खरं तर असं खोट सांगून निघणं तिच्या तत्वात बसत नव्हतं,