नक्षत्रांचे देणे - २

  • 12.5k
  • 1
  • 7.9k

'पार्किंग लॉटमध्ये गाडी लावून क्षितीज लिफ्टकडे वळला. "सायेब तुम्ही टायमाचे पक्के आहात. या ! आत्ताच सगळं आवरून बसवून ठेवलाय मॅडम ना." म्हणत शकुमावशी रूमच्या बाहेर पडली. तिला थम दाखवत प्रसन्न मुद्रेने तो आतमध्ये शिरला. 'साहेब आले वाटत.' म्हणत बाजूचे स्टाफ मेंबर आतमध्ये येऊ लागले. अर्ध्यापाऊण तासाने क्षितीज आपला पडलेला चेहेरा लपवत बाहेर निघून गेला. नेहेमीप्रमाणेच मग मागे नर्स, सिस्टर आणि वौर्डबॉय यांची ठरलेली चर्चा रंगायची. "कशाला येतो हा? एव्हढ्या वर्षांनी आता ती बाई काय बारी व्हायची राहिलेय का? उगाच नेहमीचे फेरफटके मारत बसतो." काही गोष्टी क्षितीजच्या कानावर यायच्या पण तो जाणीव पूर्वक दुर्लक्ष करायचा. अद्याप इथे येऊन जाण्याचा नेम त्यांने