नवरा बायकोचे रूसवे-फुगवे...३

  • 10.9k
  • 5.5k

आपन भाग दोन पाहिला आता पुढे..... मोबाईल हातात असून मी माझ्या रितू डार्लिंगच्या आईचा फोन काहि रिसीव्ह केला नाही. त्यामुळे तिचे आता मोठे मोठे डोळे बघून आणि तिने धारण केलेला कालिंका देवीचा अवतार बघून जीवच घाबरला.... तिने फोन ठेवला न... एकदम कालिंका देवीचे अवतार घेऊन मला जसं काय मारायलाच आली असं वाटलं.. बरं झालं तिच्या हातात त्रिशूल नव्हता. नाहीतर ही कथा इथेच बंद पडली असती.. (पण केव्हा केव्हा वाटतं तिच्या हातात त्रिशूल असतं तर बरं झालं असतं त्या स्वर्गातल्या सुंदर सुंदर चेहरे तरी बघायला मिळाले असते... काय करा राव नशीब लय वाईट माझ असो.... ) रीतू डार्लिंग एकदम रागातच आली