नक्षत्रांचे देणे - १

  • 22.6k
  • 13k

{क्षितिज आणि भूमी... जी भेटूनही न भेटणारी, एकत्र असूनही विभक्त. अशी दोन टोक. पण या विशाल पोकळीतील नक्षत्रांनी त्यांच्या नशिबी एक भेट लिहिलेय. खूप दूर गेल्यावरही त्यांचे स्टार्स त्यांना पुन्हा पुन्हा एकत्र आणतात. इथे नक्षत्रांनी घडवून आणलेल्या अशाच अनपेक्षित भेटीमुळे सुरुवात होते एका प्रेमकथेची, या दोन व्यक्तिरेखांची एक हळुवार गुंतलेली प्रेमकथा घेऊन येत आहे, माझी हि दीर्घ कादंबरी...'नक्षत्रांचे देणे.'} गेले दयायचे राहुनी, तुझे नक्षत्रांचे देणे माझ्या पास आता कळया, आणि थोडी ओली पाने…. 'दूर कुठे, क्षितिजापलीकडे कर्णमधुर सूर उमटू लागले होते. अगदी दूरवरून... अस्पष्ट आणि अर्धवट... जणू अस्ताला गेलेला तो सोन्याचा गोळा आणि त्याच्या विरहाच्या कल्पनेने तांबूस लाल झालेली ती धरणीमाय, हे दोघे मुद्दामहून हे गाणं