आपण मागच्या भागात पाहीलं की अजयची आई सगळ्यांना अजयच्या बाबांची सगळी गंमत सांगत होती. आणि श्रीरामपूरमध्ये राधिकाची आत्या कुसूम आणि तीचा मुलगा गोविंद यांचं राधिकाच्या घरी जाऊन तिला लग्नाची मागणी घालण्याविषयी त्यांचं बोलणं होते. राधिकाच्या घरी खूप आनंदी वातावरण असते. तिच्या बाबांची तब्येत बरी होते आणि ते कामाला जाण्याविषयी बोलतात.... आता बघूया पुढील भागात काय होते ते..... राधिकाच्या बाबांची तब्येत पण आता एकदम बरी झाली होती. ते पण आता नियमितपणे त्यांच्या कामावर जात होते. राधिकाचे शाळेचे दिवस पण छान चालले होते. आज सकाळपासूनच राधिकाच्या घरात मेघा मीराचा गोंधळ चालू होता. दोघीही एकमेकींना कोणत्याही गोष्टीवरून चिडवत होत्या. आणि सगळे दोघींची