प्रकरण दहा. दैविक दयाळ, सरकारी वकील, अॅड.खांडेकर यांचा मानस पुत्र समजला जायचा. तो कोर्टात उठून उभा राहिला. “ युवर ऑनर, राज्य सरकार विरुद्ध आकृती सेनगुप्ता हा खटला उभा राहिलाय आणि ही फक्त प्राथमिक तपासणी आहे. हे पाहण्यासाठी की आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध होण्या एवढा पुरेसा पुरावा सरकार पक्षाकडे आहे का . सरकार पक्षातर्फे मी खटल्याचे काम पाहणार आहे. इथे आरोपी तर्फे पाणिनी पटवर्धन हजर आहेत. ते कामकाज सुरु करायला तयार आहेत असे मी समजतो.” “ आम्ही बचाव पक्ष तयार आहोत.” पाणिनी म्हणाला. “ आम्ही सरकार पक्ष तयार आहोत.” “ तर मग कामकाज सुरु करा.तुमचा पहिला साक्षीदार बोलवा.” न्यायाधीश कार्तिक भाटवडेकर म्हणाले. “ माझा पहिला साक्षीदार आहे,