प्रेमगंध... (भाग - १९)

  • 8.9k
  • 4.8k

थोड्या वेळाने मेघा दोघांसाठी चहा घेऊन आली. तीने चहाचे कप त्यांच्यासमोर पकडले. दोघेही परत तिच्याकडे बघतच राहिले. मेघाने दोघांनाही चहा दिला. मेघा दोघांनाही बघून गालातल्या गालातच हसत होती. ती चहा देऊन घरात निघून गेली. अजय - "अर्चू, मला असं वाटते, तू बोलतेय ते खरंच आहे. आपल्याला रंग वेगवेगळे दिसतात की आपले डोळेच रंगबिरंगी झालेत?" मेघा आणि मीरा दोघीही त्यांचं ऐकून घरात खूप हसत होत्या. अजय आणि अर्चना दोघेही विचारातच पडले होते. आणि दोघांनाही हसू आलं. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ अजय आणि अर्चना दोघेही बसून चहा पित होते. थोड्या वेळाने मीरा बाहेर आली आणि ती चहाचे कप घेऊन घरात जाऊ लागली. अर्चनाने तिला आवाज