(आपण मागच्या भागात पाहीलं की, अजय त्याच्या आईबाबांसोबत राधिकाच्या घरच्या परिस्थितीविषयी बोलतो. आणि त्याचे आईबाबा पण त्याला खूप समजून घेतात. अजय- "आई बाबा खरंच मी खुपच नशीबवान आहे... तुमच्यासारखे समजदार आणि प्रेमळ आईबाबा मला भेटले... खुपच समजून घेतात तुम्ही मला..." बाबा- "अरे तुला समजून घेणार नाही तर आणखी कोणाला घेऊ... तू खुश तर आम्ही खुश... तुझ्या सुखातच आमचं सुख आहे... हो ना गं सावी..." आई- "हो अगदी बरोबर बोललात तुम्ही...." आईबाबांचं बोलणं ऐकून अजयला खुप छान, आणि मनालाही तेवढंच समाधान वाटत होतं... आता पुढे...) ----------------------------------------------------------- अखेर राधिकाच्या घरी जाण्यासाठी रविवारचा दिवस उजाडला. अजय खूप खूश होता. तो सकाळपासूनच गाणी गुणगुणत