दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण-९)

  • 9.1k
  • 5.2k

दॅट्स ऑल युअर ऑनर (प्रकरण नऊ) वकिलांसाठी राखून ठेवलेल्या खोलीत पाणिनी पटवर्धन, आकृती समोर बसला होता.“ तू मला जे जे घडलंय ते सर्व च्या सर्व सांगितलं आहेस?” त्याने विचारले.“ एकूण एक गोष्ट सांगून झाल्ये माझी.” आकृती म्हणाली.“ ते तुझ्यावर आरोप पत्र ठेवताहेत. त्यांच्याकडे काहीतरी छुपा पुरावा आहे जो मला माहीत नाहीये.”“ त्यांच्याकडे काय पुरावा आहे मला माहीत नाहीये पण मला एकाच माहीत आहे की मी त्याला मारले नाही. माझ्याकडे सुरा असता तर मी त्याला नक्की मारला असता.” उद्वेगाने आकृती म्हणाली.‘’ अं हं असल काही उच्चारू सुध्दा नकोस ! तू पोलिसांना सर्व काही सांगितलस?”“ हो. मी खरे म्हणजे सांगणार नव्हते, म्हणजे सांगायला नको