दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण-८)

  • 9.8k
  • 5.4k

दॅट्स ऑल युअर ऑनर भाग ८पाणिनी त्याच्या ऑफिस मध्ये परत आला तेव्हा ओजस त्याची वाट बघत होता.“ पोलिसांनी आकृती सेनगुप्ता ला पकडलंय.” ओजस म्हणाला.“ त्यांनी तिला कुठे शोधून काढले?”“ देवनारमध्ये, मैथिली च्या अपार्टमेंटमध्ये.” “ पण त्यांना तिच्याच घरी शोधावे हे सुचले कसे?” पाणिनी ने विचारले.“ बहुदा तिच्या सगळ्याच मैत्रिणींकडे त्यांनी चौकशी केली असावी.”“ सौम्या, मला अॅड.खांडेकर ना फोन लाऊन दे .” पाणिनी ने सौम्या ला सांगितले. “ मला त्यांच्याशीच वैयक्तिक बोलायचं आहे,पण ते अगदी नसतीलच तर त्यांच्या हाताखालच्या वकिलाशी बोलेन .”सौम्या ने फोन लावला आणि पाणिनी ला खूण केली. “ ते येताहेत फोन वर.”पाणिनी ने तो उचलला. “ हॅलो अॅड.खांडेकर ,”