दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण-१)

  • 17k
  • 2
  • 9.9k

(माझी रहस्यकथा दॅट्स ऑल युअर ऑनर यातील सर्व पात्रे,प्रसंग, कथानक, काल्पनिक असून त्याचा जिवंत,मृत व्यक्तींशी किंवा वास्तवाशी, तसेच अन्य कोणत्याही भाषेतील, कथे शी संबंध नाही)दॅट्स ऑल युअर ऑनरप्रकरण १आकृती सेनगुप्ता ने आपली गाडी लुल्ला रोलिंग या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवलेल्या जागेत लावली तेव्हा पावसाला नुकतीच सुरुवात झाली होती.थंड बोचरी हवा पडली होती. तिने गाडीच्या काचा लावल्या आणि आपला रेन कोट कसाबसा गुंडाळला आणि झपाझप चालत ‘ फक्त कंपनीच्या सेवकांसाठी ‘ अस लिहिलेल्या दारातून आत आली.दुपार पर्यंत पाऊस पडतच होता पण आकृती ला ती इमारत सोडायची गरज नव्हती कारण कॅफेटेरीया असलेल्या मुख्य इमारतीत जाण्यासाठी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तळ घरातील बोगद्याचा रस्ता होता.ऑफिस