कविता संग्रह.... - 3 - अंतिम भाग

  • 8.7k
  • 1
  • 3.1k

परंपरा मराठी मनाची... वाट असते सुख - समृद्धीच्या क्षणाची नेहमीच असते स्तुती त्या मराठी बाणाची पूर्वजांनी जपली ती टिकवून ठेवूया परंपरा करेल उर्जावान प्रत्येकाच्या ही अंतर्मना साधी पण तितकीच निर्मळ असते ही वाईटांचा तितक्याच शौर्याने नाश करणारी अशी ती गुढी पाडवा ते रंगपंचमी असा असतो सणांचा क्रम खरंच नवऊर्जा निर्माण करणारे सण असतात उत्तम नशीबवान आम्ही जे लाभले आम्हास हे भाग्य जन्मेल जो या महाराष्ट्र भूमीत नसेल त्यास अभाग्य वंदन करते त्या पूर्वजांना ज्यांनी केली निर्मिती या सुखमय क्षणांची आदराने जपतो आम्ही परंपरा मराठी मनाची... ️ खुशी ढोके __________________________________________________________________________________________ गुढी - सुखमय संकल्पनांची...️ गुढी नवचैतन्याची सुख - समृद्धीची नात्यांतील गोडव्याची