जानू - 36

  • 7.3k
  • 2
  • 3.7k

आज पुन्हा उशीर झाला जानू स्वतः वरच चिडत होती..आणि गडबडीत आवरत होती.. नाश्ता न करताच..ऑफिस ला जायला निघाली होती.. आई मागून ओरडत होती..अग हळू ..किती गडबड करत आहेस...पडशील..कुठे तरी?.काही खाल्ल ही नाहीस.. आई बोलली आणि देवाने वरून तथास्तु म्हटलं की काय ? देव जाणे..पणं जानू मॅडम घरा बाहेर पाय ठेवा त च ..होत्या की उंबरठ्यावर अडकून धाडकन पडल्या ..आधीच नाजूक त्यात पडल्या म्हणजे तर चांगलच लागलं..हाताला खरचटलं होत..गुढग्यावर थोडा ड्रेस फाटून तिथे ही खरचटलं होत..डोळ्यातून पाणी वाहू लागलं होत..वरून आई ओरडत होती..सांगितलं होतं ना इतकी गडबड नको..तरी तुझं चालूच होते..पडलीस ना ? आई ने तिला उठवलं बेड वर बसवून पाणी