आधार शब्दांकन : तुषार विष्णू खांबल नुकतंच लग्न आटोपून पलाक्षी आणि सुप्रित दोघे आज आपला मधुचंद्र साजरा करण्यासाठी गोव्याला आले होते..... साधारण असलेली तोंडओळख आणि लग्नासाठी मिळालेला कमी वेळ यामुळे पलाक्षी थोडीशी बावरलेली होती..... घड्याळाचे काटे जसे हळूहळू पुढे सरकत होते तशी तिच्या हृदयायची धडधड वाढत होती..... अखेर तो क्षण आला.... त्याने प्रेमाने तिला जवळ घेतले..... तिच्या केसातून तो हात फिरवू लागला.... ती हळुवारपणे मदहोश होत होती..... तिचे डोळे बंद होत होते...... तो पुढे सरकणार इतक्यात तिने डोळे उघडले आणि त्याला स्वतःपासून दूर ढकलू लागली...... तिच्या अश्या अनपेक्षित वागण्याने तो काहीसा गांगरून गेला..... नक्की काय घडलं हे त्याला