जानू - 31

  • 7.3k
  • 1
  • 3.8k

अभय जयपूर ला निघून गेला पण जयपूर मध्ये त्याचं मन आता पहिल्या सारखं अजिबात रमत नव्हते..कसे बसे त्याने तिथे अजून चार महिने काढले आणि जयपूर ला राम राम करून तो पुन्हा आपल्या शहरात आला..एव्हाना त्याला कळून चुकलं होत की कुठे ही गेलं तरी जानू आणि तिच्या आठवणी काही त्याची पाठ सोडणार नाहीत..जयपूर मधील त्याच काम पाहून ..त्याच्या कंपनी ने त्याला रिकमंडेशन देऊन त्याच्याच शहरात त्याला एका कंपनी मध्ये जॉब दिला होता तो तिथे जॉईन झाला होता..रोज ऑफिस , फ्रेण्ड्स..घरी गेला की पुन्हा जानू च घर पाहणं तिथे तिला बंद डोळ्यांनी अनुभव न..सुट्टी दिवशी फ्रेण्ड्स सोबत बाईक राईड करणं ..सर्वांना मदत