जानू - 30

  • 7.5k
  • 1
  • 3.8k

अपूर्वाच्या लग्ना दिवशी.. अभय सकाळ पासून तयारी करत होता..लग्न १ ला होते..पणं त्याने आकाश ला सकाळी लवकरच आपल्या घरी बोलावलं होत..आकाश तर कधीचा तयार होऊन येऊन बसला होता..पणं अभय ची तयारी काही केला संपत नव्हती..एव्हाना त्याचे ४ ड्रेस बदलून झाले होते..हा कसा आहे रे ? यात चांगला तर दिसतो ना मी ?आकाश मात्र वैतागला होता आणि हसत ही होता.. आकाश: अभ्या लग्न अपुर्वाच आहे रे? हे तर अस झालं आहे बेगानी शादी में अब्दुल्ला दि वाना... अभय: माहित आहे तिचं च आहे ..मी कुठे म्हटलो माझं आहे ? आकाश : पणं मला तर वाटतं आहे ..तुझं आहे की काय ?