दिलदार कजरी - 32 - अंतिम भाग

  • 5.9k
  • 1
  • 2.1k

३२. सुखांत काही दिवसातच मंदिरात मंडप घातला गेला. अगरवाल आणि अगरवाल धान्याचे होलसेल व्यापारी, या दुकानाचे मालक देवचंद अग्रवाल. त्यांचा एकमेव सुपुत्र केशव नि ईश्वरलाल मौर्या गुरूजींची ज्येष्ठ कन्या लीला यांचा विवाह संपन्न झाला. पाठोपाठ संतोकसिंग ठाकूर यांचे पुत्र दिलदारसिंग आणि मौर्यागुरूजींची द्वितीय कन्या कजरी हिचा. अर्थात एकूण परिस्थिती पाहून हा दुसरा विवाह पहिला पार पडल्यावर लावला गेला. अगरवाल व्यापारी म्हणजे गावातील मोठे प्रस्थ. त्यांचे दुकान दोन वेळा संतोकसिंगच्या टोळीने लुटलेले. त्या संतोकसिंग पुत्राशी कजरीचा विवाह एकाच वेळी होणे अशक्य. तेव्हा तडजोड केली गेली. लीलाची बिदाई झाली. तिची दूरची एक बहीण पाठराखीण म्हणून पाठवली गेली. नि त्यानंतर दिलदारसिंग संतोकसिंग ठाकूर