स्थलांतर - 1

  • 10.7k
  • 4.7k

स्थलांतर,,.. राहुल एक हुशार, चंचल, मुलागा काहीच दिवसापासून शहरात आला. गावाकडे काहीच मन लागेल असं काम मिळेना त्यामुळे त्याने विचार केला आपण शहरात जाऊन काम करावे.. जेमतेम बारवी पास केली. पुढे शिकण्यासारखे खूप होते. पण घरची परिस्थिती बेताची त्यामुळे घरात मदत हवी.. गावाकडं काम म्हणजे मोलमजुरी करणे त्यात तेही कधी लागायचं तर कधी नाही. तालुक्यात एका ठिकाणी मेडिकल मध्ये जॉब करायचा परंतु पगार खूप कमी.. तिथे पूर्णवेळ करावं तर त्यातही भागणार नव्हतं. घरची लोक सारखी टोमणे मारत बस आता बारवी झाली. नाशिक, पुणे, कुठेही कंपनीत काम बघ.. इथे राहिला तर कोणी पोरगी देणार नाही. गावात असच फिरण्यात वेळ वाया घालू