मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 19

  • 8.5k
  • 1
  • 3.7k

पुढे... "ये किसी नाम का नहीं होता, ये किसी धाम का नहीं होता। प्यार में जब तलक नहीं टूटे, दिल किसी काम का नहीं होता।" किती तंतोतंत लिहिल्या आहेत ना अंजुम रेहबार यांनी या ओळी...!! सगळेच दुःख पचवून घेण्याची ताकत देवाने माणसाला दिली आहे, पण मन दुखल्यावर त्याचा ईलाज कसा करायचा याचं उत्तर जगात कुणाकडेच नाही...या जगात जितकं सोप्प प्रेमात पडणं आहे, तितकंच कठीण त्यातून निघणं... म्हणजे जवळजवळ अशक्यच...!! त्यामुळेच आपले वपु म्हणत असावे की जिवंतपणी मरण यातना भोगायाच्या असतील तर प्रेम करावं... आणि मी ते केलं...कोणावर प्रेम करणं म्हणजे त्याच्यावर मालकी हक्क आपण प्रस्थापित करत नाही, की जेणेकरून आपण