निळ्याभोर आकाशाखाली अथांग पसरलेला समुद्र त्यात येणारा लाटांचा आवाज , तो मंद वारा, पक्षांचा किलबिलाट, त्यात येणाऱ्या वाळूचा एक एक थर चढणारे सगळ कस मोहून टाकणारे होत ,पण त्यात एक भयाण शांतता ती कधी पण जीव घेणी असू शकते अशी, आणि त्यातच किनार्यावर एक मुलगी झोपलेल्या स्थितीत असते, हळू हळू ती स्वतचे डोळे उघडते, तेव्हा तीच डोक खूप जड झालेले असत , स्वताला सावरत ती उठ्ते आणि बघते तेव्हा ती एका अज्ञात ठिकाणी आहे अस तिला जाणवत , ती सावकाश उठते ,मनात धडधडत असते तेव्हा समोर बघते तर तिला अस वाटत हां तिच्या समोरचा समुद्र आता तिला गिळून टाकेल ,