मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 18

  • 9.3k
  • 1
  • 3.9k

पुढे... "मंजिल पानेवाला हर कोई खुशनसीब नही होता, सफर गर प्यार का हो, तो उसका अंजाम नही होता।" प्रेमात पडतांना कुठलेच कष्ट लागत नाही म्हणतात..खरंय की ते..!! आपण बेसावध असतो आणि प्रेम नावाचं वादळ आपल्याला येऊन धडकतं. वादळात तर कोणीही फसू शकतं, त्यातून सुखरूप बाहेर पडायला मात्र कस लागतो...पण या प्रेमाच्या वादळातून बाहेर पडताच येत नाही, उलट आपल्याला आपले पाय तिथे घट्ट रोवून आयुष्यभर त्याचा सामना करत राहावा लागतो... सतत.. अविरत...! काय बोलला होता चेतन त्यादिवशी?? अम्म्म...हं... आम्ही प्रेमाच्या समुद्रात बुडालो आहे... वेडा कुठला...!! पण काहीवेळा असा फिलॉसॉफी झाडतो की त्याचे शब्द विचार करायला भाग पाडतात... त्याचं आणि साक्षीचं प्रेम