साद हृदयाची

  • 8.8k
  • 1
  • 2.6k

सुमित्राताई आज दुपारपासूनच खूप अस्वस्थ होत्या. घरातील कामातदेखील त्यांचे लक्ष लागत नव्हते. नेहमी अगदी प्रेमाने सर्वकाही करणारी आपली पत्नी इतकी अस्वस्थ झालेली पाहून श्यामरावदेखील काळजीत पडले. खरतरं गेले चार महिने या उभयंतांनी घरात काही गोडधोड केले नव्हते की कुणा नातेवाईकांकडे गेले नव्हते. सुमित्राताई आणि श्यामराव हे सुखवस्तू कुटुंबातील जोडपे. लग्नाला १० वर्षें होऊनही घरात पाळणा हलेना. अपत्यप्राप्तीसाठी नातेवाईकांनी थोरामोठ्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींची त्यांनी मनोभावे पूर्तता केली. शेवटी वर्तमानपत्रातील एका जाहिरातीने त्यांचे लक्ष वेधले. आता हा शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी डॉ. पाटील यांच्याकडे उपचार करण्याचे ठरविले आणि आश्चर्य म्हणजे अगदी पहिल्याच महिन्यात त्यांना गोड बातमी मिळाली. त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. मोठ्या