श्वास असेपर्यंत - भाग २३

  • 6.7k
  • 2.2k

" उद्या तुम्हांला न्यायालयात हजर करणार आहे !!! गुन्हा सिद्ध झाल्यास उरलेले आयुष्य इथेचं काढावे लागेल. "अशी पोलिस शिपायांनी तंबी दिली. मी मात्र आता काय करावे ??? काय होईल उद्याला??? या विचारात बुडालो होतो . चुकी नसतांना , माझ्यावर हा आरोप का लावावा या विचारानेचं माझी झोप उडाली होती !!! समोर दिसणारा नोकरीचा भविष्यकाळ, पूर्णवेळ नोकरी , आईला सर्व सुख देणार , सर्व व्यवस्थित होईल , या आशेने मी जगत होतो. पण आता ते स्वप्नही धूसर झाल्यासारखं वाटत होतं. माझ्या आयुष्यांला तुरुंगात काढावे लागेल,