श्वास असेपर्यंत - भाग १९

  • 6.1k
  • 1
  • 2.4k

एके दिवशी मी आणि आनंद कॉलेज मधून घरी जायला निघालो. सायंकाळ झाली होती. जवळपास पाच साडेपाच वाजले असावे. वसतिगृहाच्या पाच मिनिटे अंतरावर असतांना मला आणि आनंद ला लक्ष्मी आणि एक बाई सोबत बाहेर रस्त्याने जातांना दिसली. लक्ष्मी सोबत एक स्त्री असल्याने तिला आवाज कसा द्यायचा हा ही प्रश्न होता. लक्ष्मी च्या चेहऱ्यावर असणारे हास्य दिसत नव्हते. चेहरा पडलेला होता. पण आमची दोघांची लक्ष्मीला आवाज देऊन बोलण्याची हिंमत होत नव्हती. पण प्रेमाचा विषय असल्याने, आणि महिना झाला लक्ष्मीच्या आठवणीत सारखा झुरत असल्याने आज ही हिंमत करावीचं लागेल???? महिना भरापासून मनात उठणाऱ्या वादळाला लक्ष्मी कडून जाब घेऊन