श्वास असेपर्यंत - भाग १८

  • 7k
  • 1
  • 2.5k

वसतिगृहात परत आल्यावर मी आनंदला झालेला प्रकार सांगितला. तू म्हणत होता तसंच झालं. लक्ष्मीने प्रेमाचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला. माझ्या छातीत धड धड आणि कालवाकालव वाढली होती. काय बोलावं?? काय उत्तर द्यावं ?? सुचत नव्हतं. " मग तू काय उत्तर दिलं ???"आनंद उत्स्फूर्तपणे विचारणा केली. " काय उत्तर देणार !!! तुला तर माहीतच होतं ना की, लक्ष्मी मला आवडते. मग अधिक विचार न करता मी तिला सांगितलं कि, माझं ही तुझ्यावर प्रेम आहे. फक्त मी सांगण्यासाठी भीत असायचो.