फिर मोहोब्बत करने चला है तूशब्दांकन : तुषार खांबल दोन वर्ष...... तब्बल दोन वर्षानंतर आज परीचा मेसेज आला होता..... "मला कॉल करशील का???" त्याच्या जीवाची घालमेल सुरु झाली..... काय काम असेल???? अचानक माझी आठवण कशी आली??? पुन्हा काही प्रॉब्लेम तर झाला नाही ना???? अश्या अनेक विचारांनी त्याच्या डोक्यात गर्दी करायला सुरुवात केली.... हो-ना हो-ना करता करता त्याने तिला कॉल केला.... हॅलो.... कसा आहेस मी मस्त.... तू बोल मी पण मजेत...... अरे माझा मोबाईल खराब झाला होता.... रिपेअर केला तर सर्व नंबर उडाले.... तुझा नंबर हवा होता म्हणून मेसेज केला...... अच्छा(तिच्या मनात आजही आपल्याबद्दल आपुलकी आहे हे ऐकून त्याला भरून आलं