जल तू ज्वलंत तू! - 8 - अंतिम भाग

  • 5.2k
  • 2.2k

8 --------------- आजोबांनी जेव्हा ही कथा पूर्ण केली. सगळे मन लावून ऐकत होते. हा रोजचा कार्यक्रम होता. रात्रीच्या जेवणानंतर दोनही मुलं आजोबांजवळ येऊन बसत आणि कथा पुढे सुरू होई. त्या मुलांच्या आई-वडिलांनी सुद्धा ही गोष्ट ऐकली होती. या गोष्टीचा फायदा असा झाला की, मुलांच्या मनातून ‘आत्मा’ची भीती नाहीशी झाली. गेल्या काही दिवसात घडलेल्या चमत्कारिक घटनांनी त्यांच्या मनात भीती दडली होती. त्यांना कळले होते की, आत्मा एक निरागस प्राण असतो. तोसुद्धा आपल्या दु:खात बुडालेला. तो कोणाला काय त्रास देणार? आजोबांनी सांगितले की आत्मा पाण्याच्या बुडबुड्यासारखा जाणवतो. तो कायमचा नसतो. त्याच्यामुळे कोणाला काही त्रास होताना किंवा भीती वाटताना पाहिले, तर ते सुद्धा