शाहिर... - 6

  • 5.9k
  • 2.1k

'शाहीर'! क्रमशः.. भाग- सहा "कलापथक बंद केलं नाही, बंद झालं. चांगल्या फळालाच किड लागायचा थोका जास्त असतो, त्यासाठी ते फळ जपावं लागतं, त्याची काळजी घ्यावी लागते, तसं कलापथकात काम करणाऱ्या कलाकारांचं झालं. त्यांनी स्वतःच्या जीवनाची काळजी घेतली नाही. तुला तर ठावं आहेच; बाकी मी अजून काय सांगणार. पाच सहा पोरं दारूचं व्यसन करत होती, तरीही आमचं कलापथक चालू होतं, कलापथकात काम करणारी काही चांगली चांगली माणसं वयोमानानं गेली आणि जी काम करण्यारखी होती, त्यांना व्यसनाची किड लागलेली. वाईट येवढंच वाटतंय, की ज्यांच्या अंगात वेगवेगळी चांगली कला होती, अशी सहा सात पोरं दारूच्या व्यसनामुळं वयाची पन्नाशी सुद्धा गाठू शकले नाहीत.