जानू - 23

  • 8.7k
  • 1
  • 4k

दृष्ट लागण्या जोगे सारे गालबोट ही कुठे नसे जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे.. जानू च आवडत गाणं ..गाण्यात ती स्वतःला व समीर ला त्या हीरो हिरोइनच्या जागी समजून स्वतःशीच हसत होती..पणं तिला कुठे माहित होत ..तिच्या या स्वर्गा सारख्या वाटणाऱ्या आयुष्याला कधीच दृष्ट लागली होती. समीर च वागणं पूर्ण पने बदलून गेल होत..तो आता ना जानू सोबत नीट बोलत होता ना लवकर तिच्या मॅसेज ,फोनचा रिप्लाय देत होता...जानू काही विचारलं तर कामात होतो,वेळ नाही,खूप बिझी आहे म्हणून तो तिला टाळू लागला होता.. जानू : काल लवकर झोपलास ? बोलला नाहीस ? समीर : हो ..झोप लागली.