लग्नप्रवास - 10

  • 9.6k
  • 1
  • 3.6k

लग्नप्रवास- १० एकदाचे प्रीती आणि रोहन घरी पोहचले. तो दिवस पूर्णवेळ त्या दोघांनाही आराम केला.दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे घरच्यांनी सांगितले, कि तुम्ही महालक्ष्मी आणि मुंबादेवीचे दर्शन घेऊन या. दोघांचे चेहरे पाहण्यासारखे झालेले. कारण दोघेही थकलेले आणि त्याचा आराम करायचा मूड होता. परंतु नाही कसे बोलणार म्हणून त्यांनी होकाराथी मान डोलावल्या. सकाळी दोघांनाही नाश्ता करून तयारीस लागेल. प्रितीने छानशी साडी नेसली आणि रोहन शर्ट पॅन्ट घालून जाण्यास निघाले. पहिले त्यांनी महा लक्ष्मीचे दर्शन घेतेले. तिकडे खण नारळाची ओटी घेतली, तिथेही दर्शन व्यस्थित झाले. थोड्यावेळेने त्या दोघानाही मुंबादेवीचेही दर्शन घेतले. आणि संध्याकाळी थकून भागून घरी आले.