दिलदार कजरी - 30

  • 5.7k
  • 2.3k

३०. भैरवलाल! "या या. भैरवलाल." पुजारीबुवांनी स्वागत केले नि दिलदारच्या काळजाचा ठोका चुकला. भैरवलाल! मागे कोणीतरी म्हणालेले, या जन्मातील पापांचे फळ या जन्मीच भोगावे लागते.. ते खरे होणार की काय? समशेर ह्याला भेटलाच नाही की काय? या भैरू पैलवानासमोर बचाव कसा करावा? तो या अवतारात ओळखेल? नाही ओळखले तर काम सोपे, पण तो ओळखल्यावाचून रहायचा नाही. तरीही त्याने ओळखले की नाही ओळखले हे दिलदार कसा ओळखणार होता? मौर्या गुरूजी तोंडभरून स्वागत करत म्हणाले, "काय योगायोग भैरवलाल पंडित. तुमचे गुरूजी ही इथेच आहेत.." भैरवलाल दिलदारला त्या अवतारात पाहून थबकला, मग घाबरला. काही महिन्यांपूर्वी डाकूंच्या टोळीने केलेले अपहरण आठवून त्याला घाम फुटला.