दिलदार कजरी - 29

  • 5.8k
  • 2.4k

२९. जोरका झटका धीरेसे.. कजरीचा हात हातात ठेवत बारकाईने पाहात दिलदार म्हणाला, "इतनी भाग्यशाली कन्या है आपकी. इससे आपके जीवनमें नया प्रकाश आया है. तरक्की होगी तो इसी कन्या की वजहसे. इसके हाथकी रेखा कहती हैं कि इसकी बडी बहनका भी उत्कर्ष इसीकी वजह से है.. इन दोनोंका भविष्य एक दूसरेसे ऐसा जुडा हुवा है जैसे दीया और बाती, फूल और सुगंध, डाकू और बंदूक!" शेवटच्या उदाहरणानंतर दिलदारने जीभ चावली. लगेच पुढे म्हणाला, "इतना गहराईसे संबंध है कि दोनोंकी शादी एकही दिन एकही जगह होना तय है.." "काय? आचार्य, दोघांचे लग्न एकाच वेळी. म्हणजे ही कजरी लग्नाची होईपर्यंत थांबावे लागेल