दिलदार कजरी - 26

  • 6.1k
  • 1
  • 2.8k

२६. एक पाऊल अजून पुढे! शेवटी एकदाचे मास्तर भेटलेच. पहाटे पहाटे समशेर आणि दिलदार मास्तरांच्या घरी पोहोचले. गेल्या काही दिवसांत खूप काही घडून गेलेले. त्यानंतर मास्तरांची ही भेट.. "नमस्ते गुरूजी." "अरे वा! या! काय नवीन बातमी? कजरीबेटीबद्दल असणार तर गोडच असणार. आणि तुझी भगवद् गीता.. पारायणे सुरू केलीस की नाही समशेर?" "काय तुम्ही गुरूजी .." "अरे लाजू नकोस. एका डाकूला लाजणे शोभत नाही समशेर .." "डाकू? आमची शरणागती.." "अरे ठाऊक आहे.. गंमत थोडीशी." "आम्ही दोनवेळा येऊन गेलो गुरूजी." "असणार. थोडा व्यस्त होतो." "तुम्ही सरदारांशी बोललात गुरूजी .. त्यादिवशी आम्ही आलो तर.." "अरे, एखादी डाकूंची टोळी शरण येणे काही साधी गोष्ट