दिलदार कजरी - 25

  • 6k
  • 2.5k

२५. शरणागतांची शरणागती सकाळी सकाळी टीव्हीच्या आजूबाजूला सगळे टोळीकर जमून ऐकत होते. मोठया आवाजात बातम्या ऐकू येत होत्या. दिलदार उठून त्या ऐकू लागला. हरिनाथ मास्तरांच्या घरी पाहिलेला पांढऱ्या शुभ्र कपड्यातील नेता मुलाखत देत होता. मोठया खुशीत आणि स्वतःवर खुश होत तो तावातावाने बोलत होता, "आमच्या सरकारच्या प्रयत्णाने या ठिकाणी आम्ही चंबळच्या एका मोठ्या डाकूनच्या टोळीला शरन येन्यास भाग पाडले आहे. आमच्या मानणीय आनि आदर्नीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आपले राज्य दहशत मुक्त करण्याचा वसा आम्ही या ठिकाणी घेतला होता. त्या अणुषंगाने आमच्या मानणीय आनि आदर्नीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शणाखाली आनि आमच्या अथक प्रयत्णांना यश येऊन चंबळमधील एक मोठी टोळी आपली शस्त्रे टाकून शरन येणार