२३. कजरीचे निशा दर्शन! हरिनामपुरात आज सकाळ सकाळीच गडबड दिसत होती. एरवी अजगरासारख्या सुस्त असलेल्या गावात काहीतरी गजबज दिसत होती. मातीचे रस्ते होते पण ते झाडलोट करून स्वच्छ केलेले दिसत होते. जागोजागी पोलिसांची गस्त दिसत होती. ते पाहून समशेर सावध झाला. "दिलदार, मागच्या रस्त्याने जाऊ. काहीतरी गडबड दिसतेय .." तो म्हणाला नि दोघांनी रस्ता बदलला. मास्तरांच्या घराजवळ जाणारा एक पाठचा रस्ता त्यांनी पकडला. त्यांच्या घराजवळ आले तर तिथेच गाड्यांचा ताफा उभा होता. मास्तरांच्या घरात कुणीतरी आलेले दिसत होते. "बहुतेक सरकारी गाडी आहे. गुरूजींकडे कशी?" "पोलिस बघ किती आहेत.. त्या खिडकीतून बघ.. हळूच. कोण कोण आहेत..?" समशेर जवळच्या झाडावर चढून वरच्या