दिलदार कजरी - 22

  • 5.7k
  • 1
  • 2.2k

२२. कजरीशी संवाद रात्री समशेर आणि दिलदार दोघेही बसलेले. दोघेही आपापल्या विचारात. मास्तरांनी सांगितलेले समशेरला ही पटत होते, पण आपल्या रासवट आणि दांडगाईला चटावलेल्या सगळ्या डाकूगणांना शरणागतीची कल्पना एकाएकी सांगणे कठीण. एकतर त्यांना ते कळणार नाही. दुसरे, त्यातून काही जण तरी तडक सरदार संतोकसिंगास जाऊन खबर देतील. त्यानंतर तर हे सगळे अशक्य होईल. तरीही शरणागतीची कल्पना समशेरला आवडली. म्हणजे गुरुदासपूरच्या गीता बरोबर धागा जुळवता येईल, हा त्यातला मोठा फायदा. दिलदारच्या प्रेमकथेत नि प्रेमप्रकरणात त्याला हल्ली जास्त गंमत वाटू लागलेली. जिच्यासाठी जीव ओवाळून सारे काही पाठी सोडायला तयार व्हावे अशी कोणी मिळाली तर तिची ओढ आणि त्यासाठी करावी लागणाऱ्या धडपडीतील गोडी