'शाहीर'!क्रमशः.. भाग- चार".. कव्वाच झालं न्हाय, की कुठल्या प्रयोगाला मी गेलो नाही. 'माणसाच्या अंगात कलेची गोडी भिनली, की त्याला जा म्हणून सांगावं लागत न्हाय, त्याची पावलं आपोआपच तिकडं वळत्याती. मग त्याला बांधून ठेवलं तरी सुध्दा.' तुला सांगायचं म्हंजी, आमचा आर्वी ला कार्यक्रम होता आन् आम्ही कार्यक्रमासाठी बैलगाडी जुंपून इथनं दुपारचंच निघाल्यालो. बैलगाडीत पुढच्या बाजूला कलापथकाचं सगळं सामान बसवल्यालं आन् मागच्या बाजूला चार पाच जणांना बसता येईल इतकी जागा होती; त्यात आम्ही दाटीवाटीनं बसल्यालो. वर उन्हाचा नुसता रक हुता.असल्या उन्हाच्या रकीत बाकीचे आळीपाळीनं रस्त्यानं चालत होते. जाताना वाटेत एक वढा (ओढा)